राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत करीना थापा ची सुवर्ण झेप
नुकताच करीना थापाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला या तिच्या साहसाचं कौतुक करणाऱ्या पुरस्काराची चर्चा संपण्यापूर्वीच तिने पुन्हा गरुड झेप घेतली आहे. प्रो प्रीमिअर लीग यांच्या वतीने राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा २०२४चं आयोजन मुंबई येथे करण्यात आलं. या स्पर्धेत अमरावतीच्या करीना थापाने सुवर्ण पदक पटकावलंय त्यामुळे पुन्हा एकदा अमरावतीची मन उंचावली आहे.
मुंबई येथे प्रो प्रीमिअर लीग यांच्या वतीने राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा २०२४चं आयोजन करण्यात आलं . या स्पर्धेत पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारनाऱ्या अमरावतीची वीरबाला करीना थापाने सुवर्ण पदक पटकावलं आहे. अमरावती बॉक्सिंग क्लब च्या वतीने करिनाने या स्पर्धेत सहभाग घेतला या स्पर्धेत ८०० खेळाडू सहभागी झाले १९ वर्ष वयोगटात या स्पर्धा मुंबईच्या मिहीर सेन स्पोर्ट कॉम्पलेक्स येथे झालेल्या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये राजस्थानला तर फायनलमध्ये उत्तर प्रदेशला हरवलं प्रशिक्षक गौरव वानखडे यांच्याकडून करिनाने बॉक्सिगचे धडे घेतले. तिने मिळवलेल्या यशाबद्दल : अमरावति बॉक्सिंग संघटनेच्या सचिव सविता बावनथडे यांच्यासह नातेवाईक शिक्षक सर्वांकडूनच अभिनंदन केलं जातंय. अमरावती ने पूर्वीपासूनच अनेक खेळाडू घडवलेत त्यामध्ये करीना थापा या हिरकणीची भर पडली आहे . नुकताच पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवलाय. अंबा अपार्टमेंटमधील दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली. त्या बंद फ्लॅटमधील सिलेंडर बाहेर काढून करिनाने इमारतींसह सर्वांचेच प्राण वाचवले या तिच्या साहसाची द खल सर्वप्रथम सिटी न्यूजने घेतली. तिचा सत्कार केला . बॉक्सिगमध्ये करीना थापाने मिळवलेल्या सुयशाबद्दल सिटी न्यूज चॅनेलतर्फे तिचं हार्दिक अभिनंदन