वधूच्या गाडीचा पाठलाग करत थेट पोहोचला घरी, सासरच्या मंडळींना दाखवली अश्लील फोटो

एक अतिशय धक्कादायक घटना पुढे येताना दिसतंय. या प्रकरणानंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. लग्नसोहळा सुरू होता. सर्व जय्यत तयारी सुरू होती. नातेवाईक पोहोचले. त्यावेळी तिथे एक तरुण पोहोचला. त्याने थेट नवरदेवाला मारण्याची धमकी देत म्हटले की, तू ज्या मुलीसोबत लग्न करत आहेस, ती माझी गर्लफ्रेंड आहे. तिच्यासोबत लग्न केले की, तुला मारून टाकेल. यावेळी काही नातेवाईक हे त्या तरुणाची समजूत काढताना दिसले. मात्र, त्याने नातेवाईकांना थेट शिवीगाळ केली. नातेवाईकांनी त्याला धक्के मारत बाहेर काढले. ही घटना उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे घडली.
लग्नातून बाहेर काढल्यानंतर तो प्रियकर थेट नववधूच्या गाडीच्या मागे जात तिच्या सासरच्या घरी पोहोचला. त्याने तिथे गोंधळ घातला. हेच नाहीतर वधूचे फोटो एडिट करून नातेवाईकांना पाठवले. पीडितेने आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. चमनगंज येथील रहिवासी असलेल्या तरुणीने सांगितले की, तिची न्यू रोडवेज बसस्थानकासमोर फेसबुकच्या माध्यमातून मुरादाबादच्या दिव्यांश शर्माशी मैत्री झाली होती. तो तिला कायमच एकटे भेटण्यासाठी दबाब टाकत होता. 23 डिसेंबर रोजी तिचे लग्न ईदगाह कॅन्ट येथे राहणाऱ्या तरुणाशी होते. ही माहिती दिव्यांशला मिळताच तो लग्नसोहळ्याला पोहोचला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत हे लग्न मोडण्यासाठी तो दबाव टाकत होता. त्याने मुलीचे लग्न मोडण्यासाठी सर्व प्रयत्न केले. यासर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने थेट चमनगंज पोलीस ठाण्यात आरोपी दिव्यांशविरुद्ध तक्रार दाखल केली.या प्रकरणाबद्दल बोलता अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीचे लोकेशन दिल्लीत सापडले आहे. आरोपींच्या वागण्यामुळे त्या मुलीचे लग्न मोडण्याच्या मार्गावर आहे. आरोपी ज्याप्रकारे दावे करत आहे, त्यावरून सासरचे लोक तिच्याकडे आता संशयाने बघत आहेत. त्याने मुलीच्या सासरच्या घरी जाऊन काही तास गोंधळ घातला. त्यानंतर मुलीचे घरचे देखील तिथे पोहोचले. आता आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.