AmravatiLatest News
शेतकरी, मेंढपाळांसाठी माजी आमदारांचं आंदोलन

चलो अमरावती अशी हाक देत माजी आ. बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारलं आहे. येत्या ७ जानेवारीला सकाळी १० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर हे आंदोलक धडकणार आहेत. मेंढपाळां च्या साठी तसंच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमुक्ती करणार असं सांगितलं पण केली नाही आदी विविध विषय माजी आ. बच्चू कडू यांनी मांडून पत्रकार परिषदेत आंदोलनाची माहिती दिली. मेंढ्या पाळून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्यांची अवस्था बिकट आहे. वन कायद्यानुसार वन चराईवर घातलेली बंदी, मेंढपाळांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या सोयी
आदी विविध मागण्यांसाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाबद्दल दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेतली