१ जानेवारी भिमा कोरेगांव शौर्य दिनऔचित्याने, अमरावतीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन

१ जानेवारी २०२५ रोजी अमरावतीत भिमा कोरेगांव शौर्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात येणार आहे. या आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी भीम ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आल होत.
१ जानेवारी १८१८ च्या आठवणीला उजाळा देण्यासाठी १ जानेवारी २०२५ भिमा कोरेगांव शौर्य दिनाच्या निमित्ताने अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल आहे. या कार्यक्रमात ५०० महार शूरवीरांना समर्पित विजयस्तंभाला मानवंदना देण्यात येईल, त्यानंतर, ‘मायबाप समजून घेतांना’ या विषयावर प्रसिद्ध प्रबोधनकार वसंत हंकारे साहेब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आणि भव्य रक्तदान शिबीरही आयोजित केले जाईल, ज्यात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याच आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच स्थानिक पत्रकार बंधूंना सत्कार करण्यात येईल, जे आपल्या लेखणीद्वारे अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात. यावेळी संघटनेमध्ये तरुण युवक आणि युवतींना नाव नोंदविण्याचा कार्यक्रम देखील आयोजित केला जाईल. अशी माहिती भीम ब्रिगेडच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
भिमा कोरेगांवच्या इतिहासाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाच महत्त्व आहे, कारण १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यावेळी तिथे गेले होते आणि त्यानंतरपासून लाखो अनुयायी संपूर्ण देशातून मानवंदना देण्यासाठी येतात. याच पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२५ रोजी अमरावतीत विविध कार्यक्रमाच आयोजन करून हा शौर्य दिन राबविला जातो.