AmravatiLatest News
अंध विद्यालयाचे संस्थापक सचिव स्व. सुंदरलाल श्रीवास्तव यांच्या 110 व्या जयंती निमित्त “राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेचे” सुंदर आयोजन.
दि ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन अमरावतीचे संस्थापक सचिव स्व.अॅड. सुंदरलाल श्रीवास्तव यांच्या 110 व्या जयंती निमित्त डॉ.नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय व आश्रित अंध कर्मशाळा अमरावती यांच्या वतीने दिनांक 30/12/2014 सोमवार रोजी “राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अनेक दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला व अतिशय उत्कृष्ट गीतांचे सादरीकरण केले या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता मा.श्री.किशाभाऊ उर्फ अण्णासाहेब गोडबोले यांचे हस्ते डॉ.गोविंदभाऊ कासट यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे सध्याचे अध्यक्ष श्री. प्रवीण मालपाणी, सचिव अॅड. प्रदीप श्रीवास्तव, कोषाध्यक्ष श्री.सुनील सरोदे व सर्व कार्यकारणी सदस्य तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या स्पर्धेच्या यशस्वी ते करिता शाळेचे मुख्याध्यापक श्री. नवनाथ इंगोले व व्यवस्थापकीय अधीक्षक श्री. पंकज मुदगल यांच्या मार्गदर्शनात शाळा व कर्मशाळेच्या सर्व शिक्षक, निदेशक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले या स्पर्धेला परीक्षक म्हणून विदर्भ भजन सम्राट मा.श्री. गोपालजी सालोडकर व व्हाईस ऑफ अकोला किताबाच्या मानकरी कु. पूजा शेंद्रे यांनी निर्णायक भूमिका बजावली
या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ दुपारी 4:00 वाजता घेण्यात आला या बक्षीस वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ. सीमा प्रदीप श्रीवास्तव व प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रोमा बजाज तसेच इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉ.रोमा बजाज यांचा जन्मदिवस असल्याने त्यांच्याकडून शाळेच्या सर्व विद्यार्थिनींना ड्रेसचे व खाऊचे वाटप करण्यात आले या स्पर्धेचे सर्व पारितोषिक कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सीमा प्रदीप श्रीवास्तव यांच्या वतीने देण्यात आले. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक चिरंजीव यश गायकवाड यवतमाळ जिल्हा द्वितीय पारितोषिक चिरंजीव स्वराज्य वाघमारे लोहा नांदेड तृतीय पारितोषिक कुमारी आयुषी पेंढारी आळंदी पुणे या विद्यार्थ्यांना मिळाले या कार्यक्रमाचे संचालन चि. करण पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.योगिता राऊत यांनी केले.