अमरावती झोन नं ४ मधील अतिक्रमण हटवलं
अमरावती महापालिकेच्या उपायुक्तांच्या आदेशाने मोठ्या प्रमाणावरील शहरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात येतेय . शहराच्या विविध भागातील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे केले जाताहेत. ३० डिसेम्बरला संध्याकाळी अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. झोन क्रमांक 4 अंतर्गत येणारा परिसर सातुर्णा रोड ते डीपीएस स्कूल कडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकातील पान सेंटर,हातगाड्या, ठेले यांचं मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवलं.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी संध्याकाळी, 6 वाजेपासून ते रात्री 8,30 पर्यंत झोन क्रमांक 4 अंतर्गत येणारा परिसर सातुर्णा रोड ते डीपीएस स्कूल कडे जाणारा रस्त्या वरील व चौकातील अतिक्रमण हटवण्यात आलं. पान सेंटर , लोखंडी ठेले नाल्याच्या काठावर लागलेले होते रस्त्यावरहि ठेले लागलेले होते त्यामुळे साफसफाईला अडथळा निर्माण होत होता. पान ठेल्याच्या समोर बरेच भाजी विक्रेत्यांनी हात गाड्या लावून अतिक्रमण केले होते त्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत होता. याबद्दल नागरिकांच्या सतत तक्रारी येत होत्या. या तक्रारींची दाखल घेऊन पानठेले, लोखंडी ठेले, भाजीच्या हातगाड्या कार्यवाही करून जप्त करण्यात आल्या.अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख श्याम जावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी,पोलीस कर्मचारी, तसेच राजापेठ पोलीस स्टेशन चे पीआय कुलट यांचे सहकार्याने कारवाई करण्यात आ ली . अमरावती शहरामध्ये मध्ये ठिकठिकाणी अतिक्रमण असल्याचं दिसून येतंय. भाजी विक्रेते फळविक्रेते यांचं अतिक्रमण आहे. दुकानाच्या समोर दुकानदार आपल्या मालाचा शो करतात त्याही अतिक्रमणावर महापालिकेनं कारवाई केलेली आहे. परंतु त्यावर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने समस्या जैसे थे आहे.