अवैध दारू विक्रेत्यांवर धाड, ४६ हत्कारांचा मुददेमाल जप्त

नुतन वर्षाच्या शुभारंभानिमित्त, अमरावती शहरात पोलिसांनी एक महत्त्वाची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त श्री. नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखाने पेट्रोलिंग करत असताना अवैध दारू विक्री आणि बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई केली. या कारवायांच्या वेळी दोन आरोपींना पकडण्यात आले आणि त्यांच्या ताब्यातून अवैध दारू जप्त करण्यात आली. ३१ डिसेंबर रोजी, गुन्हे शाखाचे अधिकारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, गुलजार नगर कबरस्तानजवळ एक व्यक्ती टिन शेडमध्ये अवैधरित्या दारू विकत आहे. त्यावर तात्काळ कार्यवाही करून आरोपी शमशेर शहा याला रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून विविध ब्रँड्सच्या देशी दारूच्या बॉटल्स जप्त केल्या, ज्यांची एकूण किंमत अंदाजे १६,००० आहे. त्याचप्रमाणे ३० डिसेंबर रोजी आणखी एक अवैध दारू वाहतूक करणारा आरोपी विकी राजेंद्र आठवले याला पकडले गेले. त्याच्याकडून ४८ दारूच्या बॉटल्स जप्त केल्या आणि त्याच्या स्कुटीपेग गाडीला देखील ताब्यात घेतले. यामध्ये एकूण ३०,७६० चा मुदेमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपआयुक्त कल्पना बारवकार, आणि सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईने अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात आळा घालण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम यशस्वीपणे सुरू आहे.