नागपूर दुहेरी हत्या प्रकरणात आरोपींची संख्या झाली पाच

रविवारी नागपूर शहरात झालेल्या दुहेरी हत्या प्रकरणात आरोपींच्या संख्येत वाढ करण्यात आली असल्याची माहिती नागपूर पोलीस उपायुक्त मेहक स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पूर्वी तीन आरोपी होते, मात्र आरोपींच्या संख्येत वाढ झाली आहे, ज्यानी आरोपींना पलायन करण्यास मदत केली अशा दोघांचाही समावेश आता आरोपींमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणात आता एकूण पाच आरोपींची संख्या झाली आहे. मारेकरी आणि फिर्यादी हे मानलेले बहीण भाऊ होते, पैशांच्या देवाण घेवणी वरुण झालेल्या वादात मामाणे दोन भांच्याना ठार मारल्याची खळबळजनक घटना रविवारी नागपूर शहरात घडली होती.
रविवारी नागपूर शहरात झालेल्या या दुहेरी हत्याकांडाने शहर हादरले असून भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्य ते पावले उचलण्यात येत आहेत