प्रहारचं पोलीस अधीक्षकांना निवेदन

अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी माजी आमदार बच्चू कडू यांचा आपल्या भाषणातून एकेरी उल्लेख केला धमक्या दिल्या असा आरोप करून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद याना निवेदन दिल. यावेळी प्रहरींनी घोषणाही दिल्या. विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांनी माजी आमदार बच्चू कडू यांच्या बाबत जे वक्तव्य केलं. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या. या विरोधात प्रहार कार्यकर्त्यानी ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं. कारवाईची मागणी केली. निवेदन दिल्यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यानी प्रचंड घोषणाही दिल्या कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय. बहिरम च्या यात्रेतील आ. प्रवीण तायडे यांचे पोस्टर फाडले गेले. त्याविषयी बोलताना आ. प्रवीण तायडे यांनी भाषण केलं. हा मुद्दा तापलाय. या प्रकरणात आता पोलीस काय करतात याकडे सर्वांचं लक्ष्य लागलंय