मा.खा. नवनित राणा यांची नांदगाव पेठ येथील विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट

गेल्या अनेक वर्षांपासून नांदगाव पेठ येथील नेताजी क्रिडा मंडळ यांच्या वतीने भव्य विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी सुद्धा नेताजी क्रिडा मंडळाच्या मैदानावर भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कबड्डी स्पर्धेला मा.खा.नवनित राणा यांनी सदिच्छा भेट देऊन संपूर्ण विदर्भातून आलेल्या कबड्डी खेळाडूंचे मनोबल वाढवित सांगितले की जिवनामध्ये क्षेत्र कोणतेही असो त्या क्षेत्राच्या मैदानावर मजबूतीने डटून राहल्या विजय आपलाच असतो असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे मा.खा.नवनित राणा यांनी नांदगाव पेठ येथील जे महिला व पुरुष बिझीलँन्ड किंवा MIDC मध्ये दररोज कामाकरिता जातात त्या सर्व कामगारांना जाण्या येण्याकरिता नांदगाव पेठ तसेच बिझीलँन्ड येथे एस.टी चा थांबा देण्यासाठी प्रयत्न करु. त्याचप्रमाणे नांदगाव पेठ येथे नांदगाव पेठ येथील टोल MIDC च्या समोर नेण्याकरिता सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्याकरिता सोय व्हावी या करिता चांगल्या गुणवत्तेचे पांधण रस्ते बांधण्याकरिता शासन स्तरावर प्रयत्न करु असे सांगितले. तसेच नांदगाव पेठ येथील ग्रामवासियांचे दैवत असलेले काशीनाथ बाबा यांच्या जागेला धक्का सुद्धा लागू देणार नाही असा संकल्प केला. यावेळी विवेक गुल्हाने, श्रीकांत राऊत, अमोल व्यवहारे (भाजपा सरचिटणीस), निलेश अग्रवाल, बंटीभाऊ आमले, मोनु सिंग राठोड, रविभाऊ राऊत, सचिन इंगळे, विनोद सुंदरकर, संदीप अकोलकर व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.