31 डिसेंबर न्यू इयर सेलिब्रेशनसाठी कडक बंदोबस्त

नांदेडचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 31 डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या न्यू इयर सेलिब्रेशनसाठी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी इशारा दिला की, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल. 1000 पोलिसांची तैनाती, नाकाबंदी आणि विशेष बंदोबस्त यामुळे नांदेड शहरात शांततेत सेलिब्रेशन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच, माळेगाव यात्रा बंदोबस्तासाठीही मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, बांगलादेशी नागरिकांसंबंधी झालेल्या कारवाईमध्ये एटीएस आणि नांदेड पोलिसांनी संयुक्तपणे कार्यवाही केली असून, संबंधित नागरिकाची चौकशी सुरू आहे.
31 डिसेंबरच्या न्यू इयर सेलिब्रेशनसाठी नांदेड पोलिसांची तयारी पूर्ण आहे आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. नव वर्षाचे स्वागत करताना शहराची शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही यांची प्रत्येकानी काळजी घेऊन आनंद साजरा करावा असे आवाहन सिटी न्यूजच्या वतुणे करण्यात येत आहे.