Crime NewsLatest NewsNagpur
कपील नगर पो. स्टे. हद्दीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह

नागपूर मधील कपील नगर पोलीस स्टेशन हद्दीत पती-पत्नीचे मृतदेह सापडले आहेत. मृतक पत्नी अरुणा डाखोळे आणि पती लीलाधर डाखोळे यांची हत्या की आत्महत्या आहे, यावर संशय व्यक्त केला जात आहे. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी, अशी माहिती मिळाली आहे. पोलीस तपास सुरू असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. कपील नगर पोलीस स्टेशन हद्दीत सापडलेल्या दोन मृतदेहांनी परिसरात खळबळ माजवली आहे. मृतक पत्नी अरुणा डाखोळे या शिक्षिकेच्या पदावर कार्यरत होत्या, तर पती लीलाधर डाखोळे महाजेनको खपरखेडा येथे नोकरी करत होते. दोघांच्या मृत्यूमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. प्राथमिक तपासानुसार, ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असावी, असे अंदाज वर्तवले जात आहेत. शेजऱ्यानी दिलेल्या माहितीवरून मुळणेच आपल्या आईवडिलांची हत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून, हत्या की आत्महत्या याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी सखोल चौकशी केली जात आहे. आमच्या कडून या घटनेच्या पुढील तपासाची माहिती आपल्याला मिळवून दिली जाईल.