अमरावतीमध्ये भव्य विदर्भस्तरीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

अमरावती मध्ये व्दितीय भव्य विदर्भस्तरीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन अमरावती सायकलिंग असोसिएशन, दिशा संस्था, तसेच हव्यात. मंडळ द्वारा संचालित डिग्री कॉजज ऑफ फिजीकल एज्युकेशन याच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 19 जानेवारी, 2025 रोजी अमरावतीमध्ये व्दितीय भव्य विदर्भस्तरीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धा दि. 19 जानेवारी, 2025 रविवार रोजी सकाळी 6:30 वाजता होत आहे. यामध्ये 12 वर्षाखालील मुलेमुली, 15 वर्षाखालील मुलेमुली, 18 वर्षाखालील मुलेमुली, 21 वर्षाखालील मुलेमुली व खुले वयोगट पुरुष – महिला असे पाच वेगवेगळे गट ठेवण्यात आले आहे. यामध्ये अंदाजे 400 ते 500 मुले मुली सहभाग घेण्याचा अंदाज आहे. हि स्पर्धा सेलिब्रेशन लॉन, जुना बाय- पास, MIDC रोडयेथुन आरंभ होऊन गौरी इन एक्सप्रेस हायवे रहाटगाव हा मार्ग राहणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण यांची रितसर परवानगी घेण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये सहभागी स्पर्धकांना हेलमेट बंधनकारक राहील तसेच प्रथमोपचार सेवा, तज्ञ वैदयकीय अधिका-यांची चमुसुध्दा उपलब्ध राहणार आहे. स्पर्धाकरिता प्रायोजक म्हणुन बाहेती ब्रदर्स, सरोदे ऑप्टीकल्स्, गंगा प्लॉयवुड व रघुवीर मिठाई यांनी स्विकारलेली आहे. सर्व वयोगटातील विजयी स्पर्धकाला आकर्षक रोख पुरस्कार देवून गौरविण्यात येईल. स्पर्धापुर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकाला आकर्षक फिनिशर पदक देण्यात येईल. सर्व स्पर्धकांना ऑनलाईन फिनिशर ई सर्टीफिकेट देण्यात येईल. ज्या सायकलपटुकडे हेल्मेट नाही त्यांना स्पर्धेकरिता आयोजकाद्वारे नाममात्र शुल्कावर तात्पुरते स्वरुपात हेल्मेट उपलब्ध करुन देण्यात येईल.