अमरावती महानगरपालिका अधिक सक्षम व विकसित करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधावा : – आ. सौ.सुलभाताई खोडके.
अमरावती शहराच्या सर्वागीण विकासासाठी कार्य करणारी अमरावती महानगरपालिका ही अत्यंत महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. शहरी भागाच्या विकासासाठी व योजनांचा अंमलबजावणीचे मोठे दायीत्व महानगरपालिकेला पार पाडावे लागते. दिवसेंदिवस वाढते शहरीकरण लक्षात घेता नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे अमरावती शहर हे आपले घर ही भावना सर्वांनी मनीबाळगून शहराला नवा आयाम व लौकीक मिळवून देण्यासाठी सामुहीक प्रयत्नांची गरज असून सर्व यंत्रनांनी संवाद व समन्वय साधून अमरावती महानगरपालिका क्षेत्रात सुखसुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी केले.
आज दिनांक ०२ जानेवारी,२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी महापालिकेच्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहमध्ये बैठक घेवून विविध विभागांच्या कामाचा व सद्यास्थितीच्या आढावा घेतला.
सर्व प्रथम मा.आमदार महोदया यांचे मा. आयुक्त यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. त्यानंतर मा. आयुक्त यांनी महानगरपालिकेतील सर्व विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनेबाबत माहिती दिली. मा. आमदार महोदया यांनी प्रत्येक विभागात चालणारे कामाचे कार्यपध्दती बाबत माहिती घेवुन काही विषयावर उपस्थित नागरीकांसह संबंधीत अधिकारी यांचे सोबत चर्चा करुन नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करणेबाबत सुचना दिल्यात.
मा.आमदार महोदया यांनी आज विषेशतः बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, नगर रचना विभाग, टॅक्स विभाग, अतिक्रमण विभाग, उद्यान विभाग, प्रकाश विभाग, पशुवैद्यकीय विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना तसेच शिवटेकडी (मालटेकडी) व वडाळी तलाव-उद्यान, शहरातील साफ सफाई व कचरा उचलणेबाबत तसेच आरोग्य विभागाशी संबंधीत कामाबाबत नागरीकांच्या समस्यावर चर्चा करुन संबंधीतांना निर्देश देण्यात आले. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेली मालमत्ता कर वसुली अधिक सुलभ करणे, तांत्रिक बाबीमुळे काही अडचणी निर्माण झाले असतील तर त्याची दुरुस्ती करुन मालमत्ता धारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात यावे. शासनाच्या आदेशानुसार ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे मोहीम राबवून सर्वसामान्य नागरिकांना गैरसोय होणार नाही याकरीता संबंधीतांनी सर्व प्रकीया सुरळीतपणे पार पाडण्याची सुचना आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली. बांधकामा संदर्भात आढावा घेतांना प्रलंबित कामांना तातडीने गती देवून पुर्णत्वास नेण्याच्या सुचना यावेळी केल्या. शहरातील बांधकामे करत असतांना संबंधीतांनी आपली सामाजिक बांधिलकी व जबाबदारीचे भान राखून ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक करण्याची सुचना केली. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या ब-याच चांगल्या योजना आहेत या योजना अमरावती शहरी भागात राबविण्यासाठी सुध्दा आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा तसेच जन्म-मृत्यु प्रमाणपत्राची वितरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी झोनस्तरावर सॉफ्टवेअर संबंधीत तांत्रीक बाबीची सुचना केली. दरम्यान आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी शिक्षण विभागाच्या कामाची प्रशंसा करीत समाधान व्यक्त केले. महापालिकेच्या सर्व ६३ शाळा डिजीटल करण्यासह तेथे संगणक कक्ष, चांगल्या भौतीक सुविधा तसेच विद्यार्थीहित लक्षात घेता त्यांना शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण आगामी काळात प्रयत्न करण्यात असल्याचा आमदार महोदयांनी व्यक्त केल्या. चौकांचे सौदर्यीकरण, दुभाजकामध्ये हिरवळ, सिग्नलची व्यवस्था, मोकाट जनावरांपासून त्रास उदभवनार नाही याबाबत सुयोग्य नियोजन, शिवटेकडीचे संवर्धन, वडाळी – उद्याने तलावाचा पर्यटन स्थळाप्रमाणे विकास होणे सुध्दा अत्यंत महत्वाचे असल्याचे आमदार महोदयांनी बैठकीत अधोरेखीत केले. तसेच प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासह नवीन लाभार्थ्यांना सुध्दा योजनेचा लाभ देण्याची कारवाई गतीने करावी योजनेच्या कामकाजा अधिक पारदर्शकता आणण्यासाठी मंजूर प्रस्ताव व निवड यादी सुध्दा दर्शनी भागात प्रसिध्द करण्याचे सुचना आमदार महोदयांनी यावेळी दिल्या. महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविणारे विभाग बाजार व परवाना विभाग व सहाय्यक संचालक नगर रचना विभाग यांनी महानगरपालिकेचे हितजोपासने गरजेचे असून यामधून महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होवून महानगरपालिका आर्थिक सक्षम बनेल. शासनस्तरावर महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रस्ताव सादर करुन येणा-या काळात महानगरपालिकेला भरघोस असा निधी नक्कीच मिळवून देण्यात येईल. जिल्हा नियोजनमधून महानगरपालिकेला पहिले कमी निधी मिळत होता. आता जिल्हा नियोजनकडून मोठ्या प्रमाणात निधी महानगरपालिकेला मिळत असून येणा-या काळात जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहो.
स्वच्छतेच्या मुद्यांवर सुध्दा आमदार महोदयांनी महापालिका प्रशासनाला आवश्यक सुचना केल्यात. नियमित साफ सफाई, धुवारणी – फवारणी, कचरा संकलन अशी कामे घेत असतांना संबंधीत झोन अधिकारी व स्वास्थ निरीक्षक यांनी प्रत्यक्ष भेट देवून नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्याच्या सुचना केल्यात.
या बैठकीत आमदार सौ.सुलभाताई खोडके यांच्या समवेत मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपआयुक्त डॉ.मेघना वासनकर, उपआयुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, मनपा झोनस्तरीय अधिकारी, विभागप्रमुख तसेच सर्व सहकारी उपस्थित होते.