गोवंश तस्करी विरोधात धारणी पोलिसांची विशेष मोहीम
2024 या वर्षाखेरीस शेवटच्या पंधरवड्यात धारणी पोलिसांनी गोवंश तस्करी विरोधात विशेष मोहीम चालवून दिनांक 17 डिसेंबर रोजी मुस्लिम कब्रस्तान येथून बारा गाईंना जीवनदान दिले तसेच अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला… तसेच दिनांक 29 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास धारणी पासून 40 किलोमीटर दूर डबका गावात पोलिसांनी गुप्त खबरे वरून कत्तली करिता मध्यप्रदेश येथून हिवरखेड जाणाऱ्या 16 गोवंश ची खेप पकडून गोवंश तस्करांमध्ये दहशत निर्माण केली आहे… यामध्ये अंमलदार मोहित सोमेश्वर आकाशे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मजरुद्दीन अझरुद्दीन रा. चीचारी,ता तेल्हारा यांस अटक केली तसेच फरार आरोपी मध्ये 1) जफरुद्दीन अझरुद्दीन,2 अब्दुल शरीफ अब्दुल लतीफ 3) शेखलाल शेख जाफर 4) मो वाहिद मो शाहिद 5) साकिब खा नासिर खा6) झहीर खान जबी खा 7) शेख अवेज शेख इमाम 8) अन्सार खा समशेर खा 9) उबेद उद्दीन नईमुद्दीन सर्व राहणार हिवरखेड तालुका तेल्हारा जिल्हा अकोला यांचे वर महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम तसेच महाराष्ट्र छळ प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये कार्यवाही करून एकूण 246000/- रुपयांचे गोवंश जप्त करून त्यांना वंदे मातरम गोशाळा बाबंदा या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आले. अटक आरोपी मजरुद्दीन अझरुद्दीन यास कोर्टापुढे हजर केले असता कोर्टाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी मध्ये रवानगी केली..
तसेच दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी हरीसाल येथून प्रवासी ऑटोमध्ये कोंबून येत असलेला गोवंश बैल पकडून दोन आरोपीवर गुन्हा दाखल करून वाहन जप्त करण्यात आले..
मागोमाग झालेल्या तीन कारवायांमुळे गोंवंश तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आह