LIVE STREAM

Latest NewsNagpur

धावत्या रेल्वेत चोरट्यांकडून तरुणाची हत्या

नागपूर रेल्वे स्थानकाआधी सुमारे ७० नागपूर रेल्वे स्थानकाआधी सुमारे ७० किलोमीटर अंतरावर सेवाग्रामजवळ एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. एका तरुणाला धावत्या रेल्वेत चार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी बेदम मारहाण केली, या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दक्षिण एक्सप्रेस हैदराबादहून दिल्लीला जात होती. जनरल बोगीत उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला २५ वर्षीय सुशांक रामसिंग राज देखील सिकंदराबादहून या ट्रेनच्या जनरल बोगीत बसला होता. रात्री अडीचच्या सुमारास सुशांकला झोप लागली. तो झोपला असताना त्याच्या शर्टच्या खिशातून चार आरोपींनी १७०० रूपये काढून घेतले. त्यांनतर त्याच्या खिशातून आरोपी मोबाईल काढत असताना त्याला जाग आली आणि त्याने त्या प्रवाशाकडून चोरलेला मोबाईल हिसकावला. त्यानंतर चोरांनी त्याच्याकडील पैसै चोरले असल्याचंही त्याच्या लक्षात आलं आणि त्याने त्याचे पैसै परत मागितले. तरुणाने विरोध करत आरडा ओरड करायला सुरुवात केली. त्यानंतर या आरोपींनी त्याला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केलं. वेळेवर उपचार मिळू न शकल्याने त्याचा रेल्वे प्रवासा दरम्यानच मृत्यू झाला. ट्रेनमध्येच तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर ट्रेनच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एस्कॉर्टिंग टीमने नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. यानंतर रेल्वे पोलिसांनी नागपूर स्थानकावर पोहोचण्यापूर्वी जनरल डब्यातील कोणत्याही प्रवाशांना खाली उतरू दिलं नाही. ही गाडी गुरुवारी सकाळी नागपूर स्थानकावर आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर आरोपींची ओळख पटल्यानंतर चौघांनाही ताब्यात घेण्यात आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद फैयाज, सय्यद समीर, मोहम्मद अमत आणि मोहम्मद खेसर यांचा समावेश असून ते हैदराबादचे रहिवासी असून ते अट्टल चोर आहेत. अशी माहिती एस पी प्रियंका ननावरे यांनी मध्यमानशी बोलताना दिली

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!