
बेलोरा, अमरावती येथील अंबानगरी स्पोर्ट्स सिटी (एएससी) तर्फे आयोजित पहिल्या एएससी इन्व्हिटेशनल गोल्फ कप स्पर्धेत नागपूरकर अजित इंगोले हे ओपन ग्रॉस विभागात विजयी ठरले, तर रीना सिंगने महिला विभागात विजेतेपद पटकावले.
एएससी तर्फे घेण्यात आलेली ही स्पर्धा शहराच्या क्रीडा क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. भारतातील एकमेव खाजगी गोल्फ कोर्स येथे झालेल्या या स्पर्धेत अमरावती आणि नागपूरमधील ३६ गोल्फपटूंनी सहभाग घेतला होता.
काझी अहमद आणि फरदीन यांना उपविजेते म्हणून सन्मानित करण्यात आले आणि ग्रुप कॅप्टन आर. एन. भट यांनी नेट विनर ट्रॉफी जिंकली. मोनिका मेंडेकर यांनी “क्लोजेस्ट टू द पिन” पारितोषिक जिंकले. गार्गी विद्यार्थी यांनी मोस्ट बर्डीज अँड पार्सचा पुरस्कार जिंकला.
याप्रसंगी भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एएससीच्या उत्कृष्ट सुविधांवर प्रकाश टाकण्यात आला. एएससी चा ४५ एकरचा विस्तीर्ण हिरवागार प्रदेश अतुलनीय लक्झरी आणि सुविधा देतो. एएससी चे संचालक
गोल्फर शैलेश जोग यांनी सहभागींचे आभार मानले आणि गोल्फला प्रोत्साहन देण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.