आमदार रवी राणा यांचा प्रशासनावर कडक निशाणा: साफसफाई आणि भूमिगत गटारी योजनांसंदर्भात दिला आठ दिवसांचा अल्टिमेटम
आमदार रवी राणा यांनी महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये शहरातील विविध समस्या संदर्भात बैठक बोलावी या बैठकीमध्ये शहरातील साफसफाईच्या मुद्या सोबतच भूमिगत गटारी योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला विशेष म्हणजे शहरातील अस्वच्छते संदर्भात वाढत्या तक्रारी बघता आमदार रवी राणा यांनी प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टिमेटम देत साफसफाईचा नवीन कंत्राट अटी शर्ती व नवीन एग्रीमेंट सह जाहीर करावा अशा सूचना दिल्या त्यासोबतच भूमिगत गटार योजना कोटी रुपयाची असूनही अजून पर्यंत पूर्णता झालीच नाही परंतु ज्या निधीमधून काम करण्यात आले ते सुद्धा नळ जोडणी प्रशासनाने पूर्ण केल्या नाहीत अधिकांश ठिकाणी रस्ते खोदल्यानंतर पूर्ववत करण्यात आले नाही जुनी वस्ती बारीपुरा बडनेरा या ठिकाणी नवरोथांमधून 80 कोटीचा रस्ता टाकण्यात आला एक वर्ष झाले मात्र अजून पर्यंत त्या रस्त्यामध्ये जी नाली खोदण्यात आली ती बुजवण्यात आली नाही यासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले