Latest NewsNagpur
नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 702 अपराधांच्या कारवाईत जप्त झालेला 60 लाखांची दारू नष्ट

नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ पाच अंतर्गत विविध आठ पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या 702 अपराधांच्या कारवाईत जप्त केलेल्या साठ लाखांपेक्षा अधिक किमतीच्या दारूच्या साठा नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली . चला, जाणून घेऊया यासंदर्भातील सविस्तर माहिती. नागपूर शहरातील कोराडी, पारडी, यशोधरा नगर, कळमना, जरी फटका, कपिल नगर, नवी कामठी आणि जुनी कामठी या आठ पोलीस स्टेशन हद्दीतील विविध कारवाईत मोठ्या प्रमाणावर दारू जप्त करण्यात आली होती. या कारवाईतील जप्त दारूच्या मुद्देमालाची किमत सुमारे साठ लाख रुपये असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. कोर्टाच्या आणि राज्यशुल्क उत्पादन विभागाच्या परवानगीने पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली हा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या वतीने ही मोठी कारवाई करण्याचे कारण स्पष्ट करत, दारू आणि नशेच्या पदार्थांचा नाश करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.
ही कारवाई करत असताना शालेय विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयीन नवयुकांना पाचारण करण्यात आले होते. त्यांना समजावण्यात आले की दारू ही शरीरासाठी हानिकारक आहे आणि अशा नशा युक्त पदार्थांवर पोलीस प्रशासन किती कठोर पावले उचलते ते देखील त्यांनी पाहिले.
पोलीस प्रशासन नेहमीच समाजात दारू आणि नशेच्या पदार्थांचा वापर रोखण्यासाठी कठोर कारवाई करत आहे. हे कार्य शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुद्ध मार्गदर्शन देण्यासाठी महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या कारवाईचा परिणाम समाजाच्या कल्याणासाठी होईल. नागपूर पोलीस प्रशासनाच्या या पावलीला सलाम