AmravatiLatest News
निपुण भारत अंतर्गत माता-पालक गटाची सहविचार सभा – शाळेतील सक्रिय सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद

दिनांक 02 जानेवारी 2025 गुरुवार रोजी मनपा उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 12, लालखड़ी येथे निपुण भारत अंतर्गत माता पालक गट यांची सहविचार सभा घेण्यात आली विषय तज्ञ सुषमा दुधे वसुले मॅडम,विशेष शिक्षक उज्वल जाधव सर, मुख्याध्यापक अब्दुल तफज्जुल यांनी माता पालकांचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी आयडिया व्हिडिओ चित्रफित दाखविण्यात आली.सदर सभेमध्ये शाळेतील माता पालकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेच्या सर्व शिक्षक वृंद व स्टाफ यांनी परिश्रम घेवून उक्त सभेत सक्रिय सहभाग नोंदविला.