बडनेरा मध्ये बालकामगाराबाबत मोठी कार्यवाही

जागोजागी निवेदन सत्र सुरु असता विषयाची गाभियता बघता प्रशासन हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे, अशातच बडनेरा येथे यवतमाळ रोड स्थित असलेल्या एसबी क्रीएशन गारमेन्ट मेन्यूफेक्चर कंपनी ही अनेक वर्षापासुन कलकत्ता बंगाल येथील कामगार हे अल्पवयीन अवस्थेत असल्याचे आढळल्याने अश्या १० बालकामगारांना कामगार उपायुक्त अमरावती यांनी ताब्यात घेतले असून एसबी क्रीएशन विरुद्ध बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. करण्यात आला आहे या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की अनेक वर्षापासून बडनेरा यवतमाळ स्थित एसबी क्रिएशन या ठिकाणी गारमेंट चे काम सुरू असते सदर काम करण्याकरिता बाहेरून कारागीर बोलवण्यात येत असते अशातच अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रे डडी यांच्या मार्गदर्शनामध्ये (सिपि स्कॉड) विशेष पथक असणारे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर आपल्या येथील कामगार उपायुक्त तसेच चाइल्ड लेबर तसेच आरोग्य विभाग जिल्हा परिषद व शिक्षण विभाग यांनी संयुक्त कार्यवाही करत असे एकूण दहा बालकामगारांना ताब्यात घेतले असून बडनेरा
पोलीस स्टेशनमध्ये एसबी क्रिएशन विरुद्ध बिएनएस -२०२३ अर्तगत कलमान्वये ७५ व ७९ बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये एस बी क्रिएशन विरुद्ध गुन्हा दाखल, नुसार कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली असून कलकत्ता येथील रहिवासी असणारे आधार कार्ड धार क दहा बालकामगारांना ताब्यात घेऊन त्यांचं रीतसर वैद्यकीय तपासणी करून त्यांना बालगृहामध्ये दाखल करण्यात येत असल्याची माहिती संबधित्त अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे, अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या विशेष पथकाची जबाबदारी आसाराम चोरमले यांच्याकडे देण्यात आली असून सदर कार्यवाही असाराम चोरमले यांच्या नेतृत्वात पोलीस हेड कॉन्स्टेबल इशा खांडे रणजीत गावंडे, निवृत्ती काकड, आशिष ठेवले यांच्या माहीती वरुन कामगार उपायुक्त अमरावती कार्यालयातर्फे संजय पांडे, तुषार देशपांडे, रवीकांत चौधरी, अभिजीत येवलीकरयांनीकेली या कार्यवाही दरम्यान तसेच आरोग्य विभाग जिल्हा परिषद चे विवेकु उमक, प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी मोहम्मद अश्फाक, तसेच चाइल्ड हेल्पलाइनचे अजय देशमुख या कार्यवाही दरम्यान उपस्थित होते बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हा बडनेरा पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनात दाखल करण्यात आलेण यांच्या मार्गदर्शनात दाखल करण्यात आले.