City CrimeLatest News
भारतीय महाविद्यालय समोरील नालीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह, डोकं अर्धवट अवस्थेत नालीत बुडालेल, राजापेठ पोलीस दाखल

राजापेठ स्थित भारतीय महाविद्यालय परिसरातील नाल्यामध्ये 3 जानेवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही नसून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. राजापेठ पोलिस ठाणे हद्दीतील भारतीय महाविद्यालय परिसरात 3 जानेवारी रोजी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली, नालीमध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासानुसार, या व्यक्तीचे वय सुमारे 35 ते 40 वर्ष असे असून, मृतकाचे पाण्यात बुडून गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतकाची ओळख अद्याप पटली नाही. मृतकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, या घटनेबाबत पोलिसांनी या घटणेबाबर मंर्ग दाखल करीत तपास सुरू केला आहे. या घटनेचा नेमका कारणांचा शोध घेत आहे. पुढील तपासात अधिक माहिती समोर येईल.