AmravatiLatest News
मनपात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
शुक्रवार दिनांक ३ जानेवारी,२०२५ रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. सावित्रीबाई फुले जयंती निमित्य महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले. या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, कार्यशाळा उपअभियंता लक्ष्मण पावडे, कार्यालय अधिक्षक नंदकिशोर पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा आत्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप पाटबागे, सुनिता गुर्जर, ज्योती पारडशिंगे, वर्षा गुहे, कल्पना दुध्याल, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, विजय आवारे, अभिजित कु-हेकर, विनोद इंगोले, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.