डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालया येथे तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे उद्घाटन.

दि ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन अमरावती द्वारा संचालीत नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय व आश्रित अंधकर्म शाळा अमरावती येथे लुईस ब्रेल यांच्या 215 व्या जयंतीनिमित्त 3 दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून सदर स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी श्रीमती. मिन्नू पी. एम. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तिवसा, भातकुली यांच्या हस्ते सहायक आयुक्त समाजकल्याण मा. श्री. राजेंद्र जाधवर यांच्या अध्यक्षतेत मा. श्री. डॉ. गोविंदभाऊ कासट, मा. श्री. पुरुषोत्तम शिंदे संस्थेत चे अध्यक्ष मा. श्री. प्रवीण मालपाणी सचिव मा. श्री. प्रदीप श्रीवास्तव कोषाध्यक्ष मा. श्री. सुनील सरोदे आणि सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. एन.एस. इंगोले, व्यवस्थापकीय अधीक्षक श्री. पंकज मुदगल यांच्या उपस्थि करण्यात आले.
उद्घाटनीय कार्यक्रमात आपल्या उद्घाटनीय भाषणात श्रीमती. मिन्नू मॅडम यांनी संस्थेच्या कार्याची स्तुती करत संस्था दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना रोजगार देण्याकरिता जे महत्त्वपूर्ण कार्य करून जे पुनर्वसन प्रकल्प चालवीत आहेत फाइल मेकिंग व मसाज सेंटर हे खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे मत प्रगट केले व याव्यतिरिक्त या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेकरीता काही मार्गदर्शन केंद्र संस्थेने सुरू करावे आणि या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाज अनुभवीन्या करीता आणावे असे मत त्यांनी व्यक्त केले
या कार्यक्रमाचे संचालन सौ. योगीता राऊत यांनी केले प्रास्ताविक सचिव प्रदीप श्रीवास्तव तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. एस. इंगोले सर यांनी केले सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आजी-माजी कर्मचारी व दानदाते उपस्थित होती उद्घाटन कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना व अतिथीना स्नेहभोजन घेऊन रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात आली सदर स्नेह संमेलन दिनांक 4 जानेवारी 24 ते 6 जानेवारी25 पर्यंत सुरू राहील या दरम्यान विविध खेळ स्पर्धा, ब्रेल लेखन वाचन, प्रश्न मंजुषा, स्वयंम शासित शाळा, इत्यादी कार्यक्रम घेण्यात येईल