पोलीस वर्धापन दिन, हेल्मेट वापरा, पोलीस बांधवानी काढली जनजागृती रॅली

पोलीस विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती शहर पोलीस आयुक्तालय वतीने अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी दुचाकी चालकांना हेल्मेट वापरा जीव वाचवा असा संदेश देण्याकरिता शहरात हेल्मेट दुचाकी रॅली काढण्यात आली, पोलीस आयुक्त रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली, रॅलीत पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस पत्नी यांनी सुद्धा फेटे घालून दुचाकी रॅलीत सहभाग घेतला. शहरात रॅलीने भ्रम्हन करून समाजउपयोगी संदेश दिला. पोलीस विभागाचा वर्धापन दिन असल्याने २ ते ८ जानेवारी दरम्यान शहर पोलीस आयुक्तालय वतीने कवायत मैदानावर विविध समाजउपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. २ जानेवारीला वर्धापन रेझिंग डे चे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या उदघाटन करण्यात आले. कवायत मैदानावर रेझिंग डे निमित्त शस्त्र प्रदर्शनी, सायबर माहिती, बॉम्ब शोधक, डॉग स्कॉड डायल ११२ बिनतारी संदेश माहिती आदी माहितीची प्रदर्शनी लावून संबंधित पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्यात आली. यावेळी शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण माहिती पोलीस बांधवाकडून जाणून घेतली, ४ जानेवारीला सकाळी पोलीस कवायत मैदान येथून वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने वाहनचालकांना वाहतूक नियमाचे पालन करावे दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरावे अशी जनजागृती करण्यासाठी भव्य हेल्मेट दुचाकी रॅली काढण्यात आली. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅली सुरुवात करण्यात आली . पोलीस खुल्या जीप मध्ये प्रतीकात्मक यमराज च्या वेशभूषेत नागरिक विराजमान करून जीप च्या मागे वाहतूक पोलीस कर्मचारी क्यू आर टी पथकं पोलीसानी हेल्मेट दुचाकी रॅलीत सहभाग घेतला. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सागर पाटील यांच्या सह पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव वाहतूक पोलीस निरीक्षक रिता उईके, ज्योती विल्हेकर यांनी दुचाकी चालवीत नागरिकांना संदेश दिला. दुचाकी चालकांना हेल्मेट वापरा जीव वाचवा असा संदेश देण्याकरिता पोलीस पत्नीनी सुद्धा हिरवे पिवळे लाल रंगाचे वाहतूक सिग्नल च्या रंगात डोक्याला फेटे बांधून उत्स्फूतपणे सहभाग घेतला, सोबतच समाजकार्य महाविद्दयालय, एनसीसी आणि इतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा रॅलीत सहभाग घेतला हातात अनेक स्लोगनाचे फलक घेत शहरात वाहतुक नियमाचा संदेश देण्यात आला, हेल्मेट जनजागृती दुचाकी रॅली, चपराशी पुरा वेलकम पॉईंट गाडगे नगर विलास नगर इर्विन गर्ल हायस्कुल सह पुन्हा कवायत मैदानावर समारोप करण्यात आला.