महादेवखोरी परिसरातील पन्नी कॉलनीत अवैध बांधकामावर अतिक्रमण विभागाचा चालला जेसीबी

अमरावती शहरातील महादेवखोरी परिसरात येत असलेल्या पन्नी कॉलनीत काही नागरिकांनी अवैध बांधकाम केल्याच्या तक्रारी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांना प्राप्त झाल्याने कलंत्रे यांनी दस्तूरनगर झोन क्रमांक ३ येथील मनपा उपायुक्त यांना कारवाईचे आदेश दिले यावर ३ जानेवारीला मनपा अतिक्रमण पथक प्रमुख शाम चावरे यांनी आपल्या कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई मोहीम राबविली, सकाळी 11 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत महादेव खोरी येथील पन्नी कॉलनी त बांधकाम करण्यात आलेल्या पायऱ्या वॉल कंपाउंड वर थेट जेसीबी चालविण्यात आला, सोबतच अवैध बांधकाम करण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले. सदर अतिक्रमण हटवून दोन ट्रक अतिक्रमणाचे साहित्य ज्यात बासे ,टिनाचे पत्रे, जप्त करण्यात आले, आता मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या आदेशा वरून आता मनपा अतिक्रमण पथक प्रमुख शाम चावरे यांच्या नेतृत्वात कर्मचारी पोलिसांच्या बंदोबस्तात धडक कारवाई करण्यास सज्ज झाले आहे.