Uncategorized
विद्यापीठ परिक्षेत्रातील नोंदणीकृत विद्यार्थी संघटनांची विद्यापीठात होणार सभा

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रात येणा-या पाचही जिल्ह्रांमधील नोंदणीकृत विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची सभा लवकरच विद्यापीठात होणार आहे. विद्याथ्र्यांना येणा-या विविध समस्यां लक्षात घेता व त्या समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी विद्यापीठाने सदरचा निर्णय घेतला आहे. तरी नोंदणीकृत विद्यार्थी संघटनांनी त्यांच्या दोन प्रतिनिधींची नावे, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, इ-मेल त्यांच्या विद्यार्थी संघटनेच्या लेटर हेडवर संचालक, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांचेकडे 13 जानेवारी, 2025 पर्यंत पाठवावे, असे आवाहन विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी केले असून त्यांचेशी भ्रमणध्वणी क्रं. 8600285857 वर संपर्क साधण्याचे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.