अवैध गुटख्यावर पुसद उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाचा छापा
दोन चार चाकी वाहनात अवैध गुटखा तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस पथका ने छापा टाकून दोन चार चाकी वाहने ताब्यात घेतले, दोन्ही वाहनातील सुमारे 19 लाख 65 हजार 348 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पुसद शहरात अचानक उपविभागीय अधिकारी पोलीस पथक ने छापामारी करून दोन चार चाकी वाहने ताब्यात घेतले वाहनातील लाखो रुपये किमतीचा गुटखा मुद्देमाल जप्त केला.. या धडक कारवाईने अवैद्य तस्करात आता एकच खळबळ उडाली आहेत.
3 जानेवारीला अवैध गुटख्याचा माल दोन वाहनात येत असल्याची गुप्त माहिती मिळताच पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने धनकेश्वर नगर मोमीनपुरा रस्त्यावर सापळा रचला, मालवाहू बोलेरो मॅक्स पिकप वाहन सह बोलेरो वाहन ताब्यात घेऊन वाहनांची तपासणी केली.. दोन्ही वाहनातून सुगंधी तंबाखू व पान मसाला गुटक्यांचा माल आढळून आला. पोलीस पथकाने दोन्ही वाहन किंमत 13 लाख सहा लाख 45 हजार 348 रुपयाचा गुटखा माल तसेच वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा ऐकून 19लाख 65हजार 348 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.. यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी सुनील मदने अभिजीत सांगडे, निलेश आडे संदीप चव्हाण प्रतीक मिश्रा गजानन जाधव नरेश नरवाडे यांनी केली.