LIVE STREAM

Latest NewsNagpur

पोटच्या मुलीला निर्घृणपणे संपविलं; अनैतिक संबंधांत अडसर ठरत असल्याने घेतला जीव; आईसह प्रियकराला अटक

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांत अडसर ठरत असलेल्या तीनवर्षीय चिमुकल्या मुलीची आईनेच हत्या केली. ही खळबळजनक घटना खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदा येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून मुलीची आई व तिच्या प्रियकराला अटक केली. गुनीता ताराचंद चामलाटे ऊर्फ कसराम (वय २९) व तिचा प्रियकर राजपाल सजनसिंग मालविया (वय २५, मूळ रा. देवास, मध्य प्रदेश), अशी अटकेतील मारेकऱ्यांची तर मानसी (वय ३),असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी गुनीताने विवाहित असलेल्या ताराचंद ऊर्फ तारासोबत दुसरे लग्न केले. लग्नानंतर ती पहिल्या पतीपासून असलेल्या चारवर्षीय मुलाला घेऊन ताराचंदसोबत गोंदियातील पालेवाडा भागात राहायला लागली. तारापासून गुनीताला मानसी झाली. दरम्यान, गुनीताचे राजपाल याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. जून २०२४मध्ये ताराचे निधन झाले. एक महिन्यानंतर राजपाल, गुनीता हे मानसी व चारवर्षीय मुलासोबत नांदा येथे आले. तेथे श्रमिकाचे काम करायला लागले. दोन्ही मुले माझीच असल्याचे राजपाल परिसरातील रहिवाशांना सांगायचा. मात्र, मानसी ही तुमच्या दोघांपेक्षा अधिक गोरी दिसते, असे म्हणत रहिवासी राजपाल व गुनीताची टिंगल करायचे. मानसी संबंधांत अडसर ठरत असल्याने दोघांनी तिचा काटा काढण्याचा कट आखला. २६ डिसेंबरला दोघांनी चिमुकल्या मानसीला बेदम मारहाण करीत तिची हत्या केली. दुसऱ्या दिवशी तिला घेऊन गोंदिया जिल्ह्यातील पालेवाडा येथे गेले. तेथे तिच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. यादरम्यान एका नागरिकाला मानसीच्या पायवर जखम दिसली. त्यानंतर राजपालने मानसीचा मृतदेह पुरून अंत्यसंस्कार केला. पुरलेला मृतदेह काढला बाहेरताराच्या पहिल्या पत्नीला मानसीच्या शरीरावरील जखमेबाबत कळाले. तिने गोंदिया पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी मानसीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले. डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. त्यानंतर गोंदिया पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. प्रकरण खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने गोंदिया पोलिसांनी हे प्रकरण खापरखेडा पोलिसांकडे वर्ग केले. पोलिसांनी दोघांना अटक करून ६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी घेतली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!