4 एकरात तुरीच्या शेतीला अज्ञात इसमाने लावली आग, 2 लाखाचे नुकसान
तुरीचे पीक काढणार तेच अज्ञात इसमाने 4 एकर मधील तुरीच्या शेतीला आग लावून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान केले.. ही घटना भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावात घडली. लावलेल्या आगीत शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांने स्पष्ट केले. विदर्भात हिवाळ्यात तुर हरभरा कापूस पिके शेतात पेरली जातात मात्र असेच तुरीचे पिके काढण्याच्या मार्गावर असताना अज्ञात इसमाने तुरीच्या शेतीला आग लावून एका शेतकऱ्याचे अडीच लाखाचे नुकसान केले. आता नुकसान भरपाई शेतकऱ्यांला मिळणार का हे आता पाहणे गरजेचे आहे. भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावातील शेतात उभ्या तुरीच्या शेतीला आग लावून शेतकऱ्याचे आतोनात नुकसान केले. या आगीत तूर जळून खाक झाल्याची घटना घडली अज्ञात इसमाने आग लावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे..प्रशासनाने मदत देण्याची गौरखेडा गावातील युवा शेतकरी कुलदीप ठाकरे यांनी केली आहे. शेतकरी बाईट लावणे अज्ञात इसमाने लावलेल्या आगीत ६ एकर शेती पैकी ४ एकरातील तुरीचे पीक जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. आता आग कोणी लावली याचा शोध पोलीस प्रशासन करणार का यात कृषी प्रशासन पंचनामा करून कोणता अहवाल देणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.