Amaravti GraminLatest News
अपघात स्थळी खा बळवंत वानखडे यांची धाव, जखमींना मदत, दिला मानवतेचा परिचय
भातकुली मार्गावर दोन दुचाकीत भीषण अपघात घडला याच मार्गाने जात असताना खा बळवंत वानखडे यांचे लक्ष जाताच त्यांनी आपले वाहन थांबवून धाव घेतली. ऍम्ब्युलन्स बोलावून स्वतः जखमींना उचलून वाहनात बसविण्यात आले. जखमींची आस्थेने विचारपूस करून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. दर्यापूर भातकुली राज्य महामार्गावर भरधव वेगात येणाऱ्या दुचाकीने समोरासमोर धडक दिल्याची धक्कादायक घटना 6 जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जगदीश पटवर्धन, प्रदीप थोरात,दुचाकी ने अमरावती वरून आसरा त्यांच्या गावी जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या दरम्यान भातकुली मार्गावरून कामानिमित्त खासदार बळवंत वानखडे आपल्या वाहनाने जात असताना त्यांचे लक्ष जाताच खासदार बळवंत वानखडे यांनी आपले वाहन थांबवून जखमींकडे तात्काळ धाव घेतली. रुग्णवाहीका बोलावून जखमींना रुग्णवाहिकेत बसवून जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचाराकरिता त्वरित पाठविले. या घटनेत खा बळवंत वानखडे यांनी आपल्या माणुसकी चा परिचय दिला. यामुळे चं खासदार बळवंत वानखडे यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
रात्रीची वेळ त्याच रस्त्यावर दुचाकीत भीषण अपघात घडणे आणि याच दरम्यान रस्त्याने जात असताना खा. बळवंत वानखडे यांचे अपघात स्थळी लक्ष जाणे तयांनी तात्काळ आपले वाहन थांबवून आधी जखमींना मदत केली. रुग्णवाहिका बोलावून जखमींना स्वतः उचलून आत मध्ये बसवून दिल्या या घटनेत अमरावती लोकसभा खा बळवंत वानखडे यांनी आपला माणुसकीचा परिचय दिला आहे.