अमरावती भातकुली मार्गावर मलकापूर येथे प्रहार सामाजिक संघटनाचे रस्ता रोको आंदोलन
जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला कुठलीही ना हरकत माहिती न देता व ग्रामीण भागातील विद्यार्थी नागरिकांचा विचार न करता बंद केलेल्या रेल्वे प्रशासनाने पर्यायी न मार्ग न देता गेट बंद केल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने मलकापूर येथे झोपी गेलेल्या प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला पोलीस निरीक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता लेखी पत्र देऊन याला कुठलीही शासनाची परवानगी नाही असे पत्र देण्यात आले व येत्या आठ दिवसात यावर मार्ग काढू या शब्दावर तीन तासानंतर सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाला विचार करून प्रहार संघटनेतर्फे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून आठ दिवसाचा वेळ देण्यात आला.या आठ दिवसात पर्यायी मार्ग न निघाल्यास प्रहार तर्फे संबंधित विभागात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निलेश पानसे प्रहार संपर्कप्रमुख यांच्या वतीने देण्यात यावेळी विविध संघटना तसेच किंवा गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थीही सहभागी होत.