Accident NewsAmravati
ऑइल ने भरलेला ट्रक पलटी चालक ट्रक मध्ये अडकला, एस आर पी कॅम्प जवळील घटना
७ जानेवारीच्या सकाळी ऑइल ने भरून येत असलेल्या ट्रक अचानक पलटी झाला, हि घटना एस आर पी कॅम्प जवळ घडली. अपघातात चालक आत अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी एस आर पी जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळाने पोलीस दाखल झाले क्रेन च्या मदतीने कोसळल्या ट्रक ला रस्त्यावर काढण्यात आले. यावेळी घटना स्थळी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. उतारावर ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटी झाला अशी माहिती समोर येत आहे. शहरातील एस आर पी एफ कॅम्प जवळील उतार रस्त्यावर सकाळ च्या दरम्यान ऑईल घेऊन अमरावतीत येणारा ट्र्क पलटी होऊन मोठा अपघात घडला. जी जे १२ ए झेड ७००३ क्रमांकाचा ट्रक चांदूररेल्वे मार्गाने अमरावती शहरात येत असताना अचानक उतार रस्त्यावर ट्रक चे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अशात ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला ट्रक वळविला असता ट्र्क पलटी झाला, ट्रक च्या आत चालक अडकला पाहताच एस आर पी एफ जवानानी त्याला बाहेर काढण्यासाठी आतोनात प्रयत्न केले, ट्रक चालकाला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी धाव घेतली, घटना स्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. उतार रस्त्यावर ऑइल वाहत गेले. जेसीबी बोलावून पलटी झालेला ट्रक रस्त्यावर आणण्यात आला, एस आर पी कॅम्प जवळ असलेल्या उतार रस्त्यावर ट्र्क चे ब्रेक फेल झाल्याने अचानक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. सुदैवाने इतर वाहनाला धडक बसली नाही ,याच स्थळी या आधी अनेक अपघात घडले आहे. अपघातात ट्र्क चालक आत मध्ये अडकल्याने तात्काळ एस आर पी जवानांनी त्याला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले, उतार रस्त्यावर जड वाहन चालकांनी लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे.