घोड्यावर बसून मेंढपाळ बांधवाच्या वेशभूषेत बच्चू कडूनी काढला मेंढपाळ पाडा मोर्चा

येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषणेने गाडगे नगर परिसर ते विभागीय आयुक्तालय ७ जानेवारीला दणाणले माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मेंढपाळ पाडा मोर्चा काढण्यात आला मोर्चात शेकडो धनगर समाज बांधव सह शेतकऱ्यांनी आपल्या शेळी मेंढी आणि घोडे घेऊन सहभाग घेतला घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालय गाठले या आंदोलनात निवेदन देऊन प्रशाषनाला एक महिन्याचा अल्टिमेट देण्यात आला. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर उग्र आंदोलन करणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पहिल्यांदाच प्रहार पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी ७ जानेवारीला दमदार धनगर पाडा मोर्चा काढला गाडगे नगर परिसरातून शेकडो शेतकरी आणि धनगर समाज बांधवांच्या उपस्थित विभागीय कार्यालय पर्यत मोर्चा काढण्यात आला. यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषणेने विभागीय आयुक्तालय गाठले. मोर्चात माजी आमदार बच्चू कडू आणि महादेव जानकर दोघांनी हातात काठी घेत धनगर समाजाच्या वेशभूषेत घोड्यावर बसून मोर्चात सहभागी झाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी मेंढपाळांना जनावरे चराई करिता प्रशासनाने जागा उपलब्ध करून देण्यात यावी शेळी मेंढी चा विमा काढून द्यावा अशा अनेक मागण्या करीत ७ जानेवारीला आंदोलन करण्यात आले, भव्य मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर दाखल झाला असता आधीच शहर पोलिसांनी विशेष सुरक्षितेत सज्ज होते. पोलीस संरक्षण जॅकेट मध्ये एक पथक तर क्यू आर टी पोलीस पथक सह शेकडो पोलीस हेल्मेट आणि अश्रूधूर साहित्य घेऊन आधीच सज्ज होते. या मोर्चावर पोलीस उपायुक्त गणेश साळी उपायुक्त सागर पाटील यांच्या नेतृत्वात अनेक पोलीस अधिकारी आणि शेकडो पोलीस मोर्चात लक्ष देऊन होते. विभागीय आयुक्त कार्यालय जवळ प्रचंडघोषणाबाजी करीत माजी आमदार बच्चू कडू यांनी निवेदन सादर केले. मागण्या पूर्ण करण्यासाठि प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेट देण्यात आला, मागण्या पूर्ण केल्या नाही तर या पेक्षाही त्रिवं आंदोलन करणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. शेतकरी आणि मेंढपाळ समाज बांधवाचे प्रश्न घेऊन माजी आमदार बच्चू कडू यांनी काढलेला पाडा मोर्चाने प्रशासना चे लक्ष वेधून घेतले. गाडगे नगर ते विभागीय आयुक्त कार्यालय पर्यत शेकडो शेतकरी धनगर समाज बांधवांची गर्दी दिसून आली एवढंच नाही तर रस्त्यावर शेकडो शेळी मेंढी आणि घोड्याचा सुद्धा मोर्चात वापर करण्यात आला . आता नेहमीच नागरिकांच्या मागण्या घेऊन आक्रमक आंदोलन करणारे बच्चू कडू यांच्या मागण्या प्रशासण पूर्ण करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे