चोरी गेलेले साहित्य परत मिळाल्याने नागरिकांनी नागपूर पोलिसांचे मानले आभार
नागपूर शहरात गेल्या वर्षी विविध प्रकरणात नागरिकांच्या दुचाकी सह इतर मुद्देमाल चोरी गेला होता.. अशा प्रकरणाचा पोलिसांनी शोध घेऊन चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला. आता त्याच साहित्याचे मूळ मालकांना आमंत्रित करून त्यांना मुद्देमाल परत केल्याने नागरिकांनी नागपूर पोलिसांचे आभार मानले आहे. पोलिस वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम पोलिस प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहेत. या सप्ताहात पोलिस प्रशासनाने केलेल्या कामगिरीची सामान्य जनतेला माहिती दिल्या जात असून,नागपूर पोलिसांनी चोरी गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेऊन मूळ मालकांना परत करण्यात आले. यात पोलिसांचे असे कार्य कौतुकास्पद आहे. वर्ष 2024 मध्ये जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकांच्या सुपूर्द पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांची संकल्पना असून त्यांच्या मार्गदर्शनात नागपूर पोलिसांनी पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून उत्तम उपक्रम राबविला 2024 या वर्षात विविध गुन्ह्यांचा खुलासा करून तब्बल तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. 6 जानेवारी रोजी पोलीस भवन येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकांच्या सुपूर्द केला आहे. नागपूर पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. याबद्दलची अधिक माहिती नागपूर शहरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी माध्यमा सोबत बोलताना दिली आहे.