Latest NewsNanded
भाजपाने सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी घेतला “2100 रुपये” फंडा, नांदेडमध्ये सदस्य नोंदणी कॅम्पमध्ये गर्दी
राज्यात भाजपा सह महाविकास आघाडी सत्तेत आली. सतेत येण्यासाठी लाडक्या बहिणींचा मोठा सहारा महाविकास आघाडीला मिळाला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्या समोर ठेऊन भाजपाने राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यास सुरुवात केलीय.आज सदस्य नोंदणीचा शेवटचा दिवस असल्याने नांदेड शहरासह जिल्ह्यात भाजपाने मोठे कॅम्प लावून सदस्य नोंदणी अभियान राबविले.परंतु सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी भाजपाने एक शक्कल लढवली. लाडक्या बहिणीला 2100 रुपय येणार असे सांगून भाजपा लाडक्या बहिणींची सदस्य नोंदणी करून घेतल्याचा प्रकार नांदेड मध्ये समोर आला आहे.नांदेड शहरातील सांगवी भागात भाजपाने सदस्य नोंदणी कॅम्प लावले होते.या ठिकाणी 2100 रुपये येणार या आशेवर लाडक्या बहिणीची भाजपा सदस्य नोंदणी कॅम्प वर मोठी गर्दी केली.भाजपाने सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी असाही फंडा अवलंबली.