लुईस ब्रेल यांच्या जयंती निमित्त आयोजित तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

दि ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन अमरावती द्वारा संचालित आश्रित अंध कर्मशाळा व डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंधे विद्यालय अमरावती येथे ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या जयंतीदिनी 4 जानेवारी पासून तीन दिवसीय स्नेहसंमेलनाची सुरुवात झाली या स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य, नाटिका, एकांकिका, खेळ, प्रश्नमंजुषा स्वयंम शासित शाळा, ब्रेल लेखन वाचन, केनिंग स्पर्धा इत्यादी विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी हिरेरीने सहभाग घेऊन आपले कौशल्य दाखविले या सर्व स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय असे क्रमांक काढून सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले हा बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रम दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता घेण्यात आला या बक्षिस वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. श्री. जितेंद्र चौधरी अपार आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती, विशेष अतिथी मा. श्री. सुनील वारे प्रादेशिक उपायुक्त सामाजिक न्याय विभाग, प्रमुख अतिथी मा. श्री. अनिल भटकर निवासी उपजिल्हाधिकारी, मा. श्री. डी. एम. पुंड जिल्हा समाज कल्याण अधिकारी, मा. श्री. दीपक मूकपल्ली सब रजिस्टर यांची उपस्थिती लाभली यावेळी मंचकावर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. प्रवीण मालपाणी, सचिव अँड. प्रदीप श्रीवास्तव, कोषाध्यक्ष मा. श्री. सुनील सरोदे, मुख्याध्यापक श्री. एन. एस. इंगोले, व्यवस्थापकीय अधीक्षक श्री. पंकज मुदगल उपस्थित होते
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष व अतिथींच्या हस्ते या स्नेहसंमेलनात सहभागी विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे वितरण करण्यात आले शाळेच्या 35 तर कर्म शाळेच्या 21 विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेमध्ये बक्षिसे मिळवली या कार्यक्रमात संस्थेला नूतनीकरण कार्यात मदत करणारे मा.श्री. महेश जैस्वाल यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यानंतर प्रमुख अतिथी म्हणून बोलताना श्री. सुनील वारे यांनी संस्थेच्या कार्याचे तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पर्यंत ज्या तत्त्वावर ही संस्था चालली आहे ते गौरवास पात्र आहे यामुळेच राज्यात संस्थेचे नाव आहे अशा शब्दांत कौतुक केले. मा.श्री. जितेंद्र चौधरी यांनी अध्यक्षीय भाषण विद्यार्थ्यांचे व संस्थेचे कौतुक केले व संस्थेला लागणारी आवश्यक ती सर्व मदत करायचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रशांत गाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. पंकज जी. मुद्दगल यांनी केले कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली.