सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मनपा हिंदी शाळांमध्ये प्लास्टिक मुक्ती आणि स्वच्छतेचा संदेश, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

स्थानिक महानगरपालिका हिंदी प्राथमिक शाळा नं. 12 व मनपा हिंदी कन्या माध्यमिक विद्यालय नागपुरी गेट, अमरावती येथे आद्यशिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. जयंती निमित्त शाळेमध्ये सावित्री ज्योति उत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त 30 व 31 तारखेला शालेय मुलांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले गेले. 1 जानेवारी ला माता पालकांसाठी ही मेहंदी स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन केले गेले. आणि शालेय विद्यार्थांसाठी आनंद बाजार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 2 जानेवारी ला चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले गेले. 3 जानेवारी ला स्वयंशासित शाळा या उपक्रमाचे आयोजन केले गेले. त्यानंतर 4 जानेवारी ला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. मुलांनी नाटक व नृत्यांच्या माध्यमातून स्वच्छता व प्लास्टिक न वापरण्याचा संदेश दिला.कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिका शिक्षण अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम सर यांचा हस्ते करण्यात आले. कार्यक्रमामध्ये शाळा निरीक्षक ज्योति बनसोड़, संध्या वासनिक, योगेश पखाले तसेच विषय तज्ञ पंकज सपकाळ, योगेश राणे, शुभांगी सुने, संजय बेलसरे व मुख्याध्यापक वर्गातून संगीता मोरे ,सखाराम कोरोटे ,प्रकाश सिडाम , सतीश मिलांदे व कुर्मी सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुलकर्णी मैडम व योगिता भालेकर मैडम यांनी केले. कार्यक्रमामध्ये शाळेतील मुख्याध्यापिका मंगला व्यास मैडम व वंदना फुंदे मैडम व शिक्षक वृंद उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संतोष साहू, गणेश सावंत, मेघा घाटोळ, भांगे मैडम,बढे़ मैडम, निखत मैडम, रिजवान सर, मुजम्मिल सर,शबनम मैडम ,किर्ति मैडम, गायत्री मैडम ,साहू मैडम, निलिमा मैडम, थोटान्गे मैडम या शिक्षकांनी व शुभम,सागर,शमसाद, वानखडे या शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वप्नील रंगारी यांनी केले.