AmravatiLatest News
उत्कृष्ट गणपती उत्सव देखाव्यात साउर येथील बाल गणेशत्सव मंडळाने पटकाविला प्रथम क्रमांक
अमरावती शहर पोलीस आयुक्तालय वतीने अमरावती शहरातील गणपती आणि दुर्गोत्सव उत्सवात उत्कृष्ट देखावा तयार करणाऱ्या मंडळाचा पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून ८ जानेवारीला सन्मान करण्यात आला. यात गणपती उत्सवात प्रथम क्रमांक साऊंर गावातील बाल गणेशत्सव मंडळाने पटकाविला तर इतर मंडळाला द्वितीय आणि तृतीय क्रमांक देऊन मंडळं पदाधिकाऱ्यांना ट्रॉफी प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच दुर्गोत्सव उत्सवात प्रथम क्रमांक आसरा येथील एकता मंडळाने पटकाविला सर्व विजेता मंडळाला ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
अमरावती शहर पोलीस आयुक्तालय वतीने पोलीस वर्धापन दीनांनिमित्त अनेक सामाजिक उपक्रम सह नागरिकांच्या माहितीकरिता पोलिसांच्या कामकाज पोलीस शस्त्र माहिती प्रदर्शनी लावून जनतेला माहिती देण्यात आली. याचदरम्यान सर्वत्र संपन्न झालेल्या गणेश उत्सव आणि दुर्गोत्सव मध्ये पोलीस आयुक्तालय हद्दीतील मंडळाने उत्कृत्ष्ट आणि सुंदर समाजउपयोगी संदेश देणाऱ्या देखावा करिता पारितोषिक ठेवण्यात आले होते त्याच मंडळाची निवड करून पोलीस कवायत मैदानावर ८ जानेवारीला मंडळ पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यात आयुक्तालय स्तर पोलीस स्टेशन स्तरावर मंडळाची निवड करून सन्मानित करण्यात आले गणेश उत्सव मंडळात या वर्षी आयुक्तालय स्तरावर वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आसरा गावातील बाल गणेश मंडळाने बाजी मारली असून मंडळाला प्रथम पारितोषिक घोषित करून पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर द्वितीय खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील पटवीपुरा येथील श्री बजरंग मंडळ तर तृतीय क्रमांक बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील बारीपुरा येथील जयहिंद गणेश उत्सव मंडळाने पटकविला. यासोबतच सर्व पोलीस स्टेशन स्तरावर गणपती उत्सव मंडळाची निवड करून त्यांना क्रमाने प्रथम द्वितीय तृतीय असे बक्षिसे देण्यात आली, यासोबतच दुर्गादेवी उत्सव मंडळात या वर्षी प्रथम क्रमांक भातकुली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आसरा या गावातील एकता सार्वजनिक नवदुर्गोत्सव मंडळाने पटकाविला द्वितीय क्रमांक खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील भाजीबाजार परिसरातील श्री अंबानगरी नवदुर्गोत्सव मंडळ आणि तृतीय बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील झिरी येथील झिरी दुर्गोत्सव मंडळाने पटकाविला, सर्व विजेता मंडळाला पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त गणेश शिंदे उपायुक्त कल्पना बारवकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून अमरावती शहर पोलीस आयुक्तालय वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवून उत्सवात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या मंडळाचा सन्मान केल्याने शहरातील नागरिकांना नवी ऊर्जा प्राप्त होत आहे, ८ जानेवारीला पोलीस आयुकातलंय वतीने घेण्यात आलेल्या सामाजिक कार्यक्रमात पोलीस आणि समाज यात सामाजिक एकतेचे वातावरण निर्माण होत आहे.