LIVE STREAM

AmravatiLatest News

एच एम पी व्ही या विषाणू च्या उद्रेकाबाबत सतर्कतेचा इशारा

सध्या चीनमध्ये एच. एम. पी. व्ही. या विषाणूचा उद्रेक झाल्याचे बातम्या येत आहेत .मानवी मेटॅन्यूमो वायरस मुळे तीव्र श्वसन संसर्ग होतो हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँड मध्ये 2001 मध्ये आढळला मानवी मेट्या न्यूमो व्हयरस हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो हा एक हंगामी रोग आहे, जो सामान्यता फ्ल्यू प्रमाणे हिवाळा आणि उन्हाळ्या च्या सुरुवातीला उद्भवतो या विषयाच्या अनुषंगाने आरोग्य संचालक आणि संचालक एन सी डी सी दिल्ली यांनी 3 जानेवारी 2025 रोजी एक निवेदन प्रसिद्ध केले त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसन संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले यात वर्ष 2023 च्या तुलनेत डिसेंबर 24 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

हे करा

  • जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिशू पेपरने झाका.
  • साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर ने आपले हात वारंवार धुवा.
  • ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा.
  • भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खाद्य खा.

* संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायू विजन होईल याची दक्षता घ्या .

हे टाळा

  • या रोगाचा प्रसार थांबविण्याकरिता हस्तांदोलन. • टिशू पेपर आणि रुमालचा पुनर्वापर टाळा.
  • आजारी लोकांची जवळचा संपर्क टाळा.
  • डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा.

* सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या गोष्टी टाळाव्या.

चीन मधून आलेल्या या नवीन एचएमपीव्ही विषाणूचा अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून जनते मध्ये नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही तथापि या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी आरोग्य यंत्रणेला सर्दी खोकला चे रुग्ण सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहे. सर्व शाळांना माहिती देण्याच्या सूचना दिल्या.
या सभेस उपस्थित सर्व शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य वर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, मनपा दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!