Latest NewsNagpur
एम.आय.डी.सी. पोलीसांनी २० चोरीच्या मोटर सायकलीसह चोराला पकडले

नागपूर शहरातील एम. आय. डी. सी. पोलीसांनी कुख्यात मोटर सायकल चोराला पकडले, ज्याच्यावर विविध ठिकाणांहून मोटर सायकली चोरी करण्याचा आरोप असून आरोपीच्या ताब्यातून २० चोरीच्या मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
नागपूर शहरातील एम. आय. डी. सी. पोलीसांच्या तपास पथकाने गुप्त बातम्यांद्वारे आरोपीचा मागोवा घेतला. आरोपीला नागपूर शहरातील लोकमान्य नगर मेट्रो स्टेशनजवळ ट्रॅप लावून पकडले. त्याच्याकडून एक होन्डा ऑक्टिवा गाडी जप्त केली. आरोपीच्या कबुलीनुसार, त्याने नागपूर, चंद्रपुर आणि गडचिरोली यासारख्या ठिकाणांहून मोटर सायकली चोरी करून विकल्या. तपासामध्ये पोलिसांनी आरोपीच्या इतर चोरीच्या 20 मोटर सायकली सुद्धा जप्त केल्या आहेत. या कारवाईमध्ये एम. आय. डी. सी. पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते. आरोपीला 8 जानेवारी पर्यंत पी.सी.आर. मध्ये ठेवण्यात आले आहे. पोलीस स्थापने सप्ताह निमित्त या कार्यवाईत जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकली मूळ मालकांना परत सुद्धा यावेळी करण्यात आल्या बाकी मोटरसायकली हस्तगत करण्याची प्रक्रिया पोलिसांच्या वतीने चालू असून पूढील तपास सुरू आहे.
सर्व तपास कार्य नागपूर शहर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून नागपूर पोलिसांनी कुख्यात मोटर सायकल चोराचा पर्दाफाश केला आहे, या कार्यवाहीमुळे नागपूर शहरातील सुरक्षेची स्थिती आणखी मजबूत होईल, अशी आशा आहे. या प्रकरणाबद्दल अधिक माहिती मिळाल्यास, आम्ही लवकरच आपल्याला अपडेट्स देऊ.