LIVE STREAM

Crime NewsLatest News

वर्गात बसण्यावरुन वाद, मित्राच्या मदतीने क्लासरुमध्येच चाकूने वार

वर्गामध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मित्राच्या मदतीने दोन सहकारी विद्यार्थ्यांवर शाळेतच चाकू हल्ला केला. अँटॉपहील येथील सनातन धर्म हायस्कूलमध्ये सोमवारी सकाळी ही घटना घडली. या हल्ल्यात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सनातन धर्म हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रिलीम परीक्षा सुरू आहेत. सकाळी नेहमीप्रमाणे प्रार्थनेसाठी शिक्षक आणि अन्य विद्यार्थी तळमजल्यावर असताना हे चार विद्यार्थी चौथ्या मजल्यावरील वर्गात जागेवरून वाद घालत होते. तेव्हा आरोपींपैकी एका विद्यार्थ्याने रागाच्या भरात आपल्या सहकाऱ्याकडील चाकूने दोन विद्यार्थ्यांवर वार केले.
या प्रकरणी आरोपी विद्यार्थ्यांविरोधात हत्येचा प्रयत्न, घातक हत्यार बाळगणे आणि त्याचा वापर करत इतरांना जखमी करणे या कलमांच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!