शालेय विद्यार्थ्याना रेझिंग डे निमित्त पोलीस प्रशासनाने दिल्या सुरक्षा टिप्स
परतवाडा येथील संस्कार इंटरनॅशनल शाळेमध्ये ‘रेझिंग डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी परतवाड्याचे ठाणेदार सुरेश मस्के, पोलीस निरीक्षक, कर्मचारी आणि बँड पथक प्रमुख उपस्थित होते. पोलिस रेझिंग डे निमित्त परतवाडा येथील संस्कार इंटरनॅशनल शाळेमध्ये सुरक्षिततेबद्दल महत्त्वाची माहिती देण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यक्रम घेतला. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे महत्त्व सांगितले आणि ‘गुड टच, बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शन केले. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना पोस्को अधिनियमाबद्दल माहिती देण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा योग्य वापर, ऑनलाइन सुरक्षितता आणि सायबर गुन्ह्यांपासून कस सावध राहाव याबद्दल महत्त्वाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या धोक्यांपासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात आले. अशाप्रकारे, संस्कार इंटरनॅशनल शाळेत रेझिंग डे साजरा करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन पोलीस अधिकाऱ्यांचे केले. यावेळी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सुरक्षा टिप्सही देण्यात आल्या. या कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते