AmravatiLatest News
आरटीओ ची मध्य प्रदेशात जाणाऱ्या 25 ट्रॅव्हल्स वर केली कारवाई
अमरावती ते धारणी मार्गाने मध्यप्रदेश राज्यात जाणाऱ्या खाजगी वाहनाची तपासणी मोहिमेला प्रादेशिक परिवहन विभागाने सुरुवात केली असून यात 59 वाहनाची तपासणी करण्यात आली. केलेल्या तपासणीत 25 ट्रॅव्हल्स दोषी आढळून त्यांना थेट 1लाख 67हजार 765 रुपयाचा दंड थोठावण्यात आला. आता हिच मोहीम किती दिवस सुरु राहणार या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे. प्रादेशिक परिवहन विभागामार्फत नागपूर ते खंडवा, अमरावती ते खंडवा , अमरावती ते बैतुल या मार्गाने मध्यप्रदेशात जाणाऱ्या बसेस ट्रॅव्हल्सची तपासणी परतवाडा या मार्गावर ५९ च्या वर ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी करण्यात येऊन यामध्ये आता पर्यंत २५ दोषी ट्रॅव्हल्स आढळून आल्या. त्यामुळे त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये दंडात्मक कारवाई करून 1,67,765 रुपये ( 1 लाख 67 हजार 765 रुपये ) दंड ठोकण्यात आला .
यापैकी 62,475 रुपयाची दंडात्मक वसुली करण्यात आली. सदरची मोहीम ही 2 जानेवारीपासून राबविण्यात आली असून, वाहन चालकांना रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती करण्यात येत आहे तसेच ही मोहीम यापुढेही सुरू राहील असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांनी कळविले आहे. या मार्गावर आरटीओ विभागामार्फत प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्स बसेस प्रवासी वाहनाची तपासणी केली जाते आहे. या तपासणी मोहिमेत आरटीओ विभागाची दोन वेगवेगळे पथके आहेत त्यामध्ये वायुवेग पथक एक व वायूवेग पथक दोन असे तैनात करण्यात आले आहे. दोन्हीही वायूवेग पथकाद्वारे या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्स बसेस वाहनाची तपासणी सुरू आहे. तपासणी दरम्यान सदर बस वाहन चालक मध प्राशन करून वाहन चालवीत तर नाही ना हे या ब्रीथ अनलायझर मशीनद्वारे वाहन चालकांची तपासणी करण्यात येत आहे. परवानाच्या अटीचा भंग, टप्पा वाहतूक, अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, रिप्लेकटर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, जादा भाडे आकारणी, वाहन कर, अग्निशम कार्यरत असणे, फिटनेस आदी बाबी मोटार वाहन कायद्यान्वये तपासणी करण्यात येत आहेत. तसेच खाजगी बसेस प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्यात येते का याची खात्री करण्यात येत असून वाहतूकदारांच्या ठिकठिकाणी बुकिंग कार्यालयांना भेटी देऊन अधिकारी ऑनलाईन आरक्षित केलेल्या तिकिटांचा तपशील व ऑफलाईन आरक्षणात केलेल्या तिकिटांचा तपशील देखील तपासात आहेत. आतापर्यंत केलेल्या तपासणीत जादा तिकीट दर घेतल्याची अद्याप एकही तक्रार आरटीओ विभागाकडे आली नाही.
प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक पल्लवी दौंड , विशाल नाबदे, सहायक मोटार वाहन निरीक्षक अमोल बोरे , ऋषिकेश गावंडे , कांचन जाधव आदी अधीकारी या मार्गावर कार्यरत आहे. अमरावती धारणी खंडवा मार्गे मध्य प्रदेश राज्यात जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स ची प्रादेशिक परिवहन विभागाने तपासनी मोहीम राबविली. रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. दोन पथकाने वेगवेगळ्या मार्गावर मोहीम राबविल्याने आता अशीच मोहीम नेहमी राबविण्यात यावी अशा मागणीला जोर धरतं आहे