नववर्षाची पहाट तपोवनात हा डॉ. गोविंद कासट मित्र मंडळीचा यंदा २६ व्या वर्षात भरगच्च उपस्थितीत साजरा
कुष्ठसेवक, कुष्ठरुगणांचे मसीहा पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांची पावनभूमी विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन येथे वंदनीय दाजीसाहेब पटवर्धन यांचे पूजन, नविन वर्षात तपोवनातुन एक प्रेरणा घेता यावी या उद्देशाने डॉ. गोविंद कासट मित्र मंडळ भर थंडीच्या दिवसात १ जानेवारी रोजी भल्या पहाटे एका कार्यक्रमाचे आयोजण करतात. अगदी परमेश्वर कृपा व दाजीसाहेबांच्याच आर्शीवादाने गेली २६ वर्षे अगदी कोरोना काळातही त्यात खंड न पडलेला कार्यक्रम सुरु आहे.तपोवन संस्थेचे अध्यक्ष, मित्र मंडळीतील प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांच्याय अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे अगदी मित्र मंडळी स्टाईलने १ तासात (खरे तर थोडा वेळ जास्त) एकुण ४० कार्यक्रमांचे एकापाठोपाठ एक दाजीसाहेब व मातोश्री पार्वती बाई पूजना नंतर कुठेही न थांबता आयोजित करण्यात आला.
मित्र मंडळी तर्फे तपोवनातील गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार, तपोवनला देणगी, अनेक मान्यवरांचे सत्कार, त्यात प्रामुख्याने नुकताच आपल्या शौर्याबद्दल मिळवलेल्या राष्ट्रपती पुरस्काराबद्दल सत्कार व तिला एक स्कुटी सानुग्रह बक्षिस म्हणुन प्रदान, अंधांच्या संस्थेला वजन काटा, अनेक संस्थांना आवश्यक साहित्य प्रदान, दिव्यांग गृहस्थांना व्यवसायासाठी निधी तसेच स्वावलंबी जिवनासाठी सिलाई मशीन, हातगाडी, दरवर्षीच्या नवीन वर्ष कॅलेंडर प्रकाशन, दरवर्षीच्या प्रथेनुसार मित्र मंडळीतील व्यक्तींची पुस्तके प्रकाशित, एका कुष्ठबांधवांची मित्र मंडळीला सहकार्य म्हणुन वृत्तपत्रची तुला, गणेश मंडळास सहकार्य, विपश्यता केंद्रास सहकार्य इ. कार्यक्रम संपन्न झाले. यात प्रमुख अतिथि सत्कार, त्यांचा परिचय, त्यांची भाषणे, लांबलचक प्रास्ताविक व आभार प्रदर्शन इ. सर्व बाबींना फाटा देत एका पाठोपाठ एक दरवर्षी प्रमाणे डॉ. गोविंद कासट यांच्या संचालनात एका वांक्यात सर्वांचे आभार मानत, शुभेच्या देत व यंदा मोठ्या प्रमाणात करीना थापा या बहाद्दर मुलीसोबत अनेकांनी छायाचित्रे काढन, अल्पोपहाराने कार्यक्रम संपन्न झाला.
तसेच या कार्यक्रमा दरम्याण अमरावती चे समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया ऊर्फ लप्पीभैय्या यांनी गोविंदजी कासट आणि मित्र परिवार यांचे कार्य अशाच प्रकारे चालत राहावे अशी शुभकामना देवुन भारत सरकार ला विनंती केली की यांचे कार्य पाहुन यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा.
मित्रमंडळीतील श्रेष्ठ सदस्य मातोश्री कमलताई गवई, धीरुभाई सांगाणी, सुदर्शन गांग, लप्पीभैय्या जाजोदिया, नानकराम नेभनानी, प्राचार्य डॉ. रामगोपाल तापडीया, धनंजय गुळरेकर, प्राचार्य डॉ. विजयकुमार भांगडीया, डॉ. श्यामसुंदर निकम, प्रा. मुकेश लोहीया इ. मंदीच्या व वेळोवेळी त्या-त्या बाबींशी संबंधित मंडळीच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम ३०० च्यावर गावातील निमंत्रित मंडळी व तपोवनवासीय मंडळीच्या कार्यक्रमासाठी अनेकांच्या सहकार्य, मार्गदर्शन बरोबरच हरिभाऊ बाहेकर, राजेंद्र चंदन, गजानन कुंटवरे, दिलीप सदार, राजन देशमुख, डॉ. राजु डांगे, सुभाष गावपांडे, भावना पसारकर, विष्णुपंत कांबे, राजेंद्र पाचगाडे, अविनाश राजगुरे, अनिल वानखडे, संजय खोडे, प्रभा आवारे, नरेंद्र तायडे, आशा निचत व समस्त डॉ. गोविंद कासट मित्र मंडळी, समस्त तपोवन वासीय मंडळी यांनी परिश्रम घेतले.