LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात 109 मृतदेह सापडले, पोलिसांकडे फक्त 5 खुनांची नोंद

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर येतेय. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात एका वर्षात 109 मृतदेह सापडल्याने धक्का बसला आहे. या मृतदेहांची नोंद अनैसर्गिक मृत्यू म्हणून केली गेली आहे. मात्र, पोलिसांकडे फक्त 5 खुनांची नोंद आहे, यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर येतेय. परळी तालुक्यात वर्षभरात 109 मृतदेह सापडले आहेत. 109 जणांचा मृत्यू अनैसर्गिक झाल्याची नोंद झाली आहे. पोलिसांनीकडे फक्त 5 खुनांची नोंद आहे. परळीत दर तीन दिवसांनी एक मृतदेह सापडतो. परळीत वर्षभरात एवढे मृतदेह सापडतातच कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परळी तालुक्यत गेल्या वर्षभरात 109 मृतदेह पोलिसांना आढळून आले आहेत. या सगळ्यांची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद आहे, यात आत्महत्या केलेले, बेवारस मृतदेह आढळलेले,अपघातात मृत्यू झालेले मृतदेह असतात मात्र एक तालुक्यत इतका मोठा आकडा भुवया उंचावणार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार परळीत वर्षभरात अवघे 5 खून झाले आहेत. त्यामुळं हा आलेला आकडा हा पोलीस तपासाचा भाग आहे, मात्र फक्त परळी तालुक्यात इतके मृतदेह आढळून येणे धक्कादायक आहे. मागील वर्षभरात परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 66 मृतदेह आढळून आले त्यापैकी 64 मृतदेहाची ओळख पटली तर 2 मृतदेहाची ओळख पटली नाही. तर, परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण 17 मृतदेह आढळले सर्वांची ओळख पटली. तर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत 26 मृतदेह आढळले त्यातील 21 मृत देहाची ओळख पटवण्यात आली तर 4 मृत देहाची ओळख पटली नाही, तीनही पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील वर्षभरात 109 मृतदेह शहर आणि परिसरात आढळून आले आहेत. दर 3 दिवसांनी 1 अशी मृतदेह सापडल्याची सरासरी आहे. या सगळ्याचा तपास जेमतेम होऊन प्रकरण फाईल बंद झाल्याचं सांगण्यात येताय.

या धक्कादायक घटनेमुळे परळी तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 109 मृतदेहांची नोंद, त्यातले बहुतेक अनैसर्गिक मृत्यू आणि पोलिसांचा तपास न होता प्रकरणांचा फाईल बंद होणे, यामुळे पोलिसांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आशा आहे की, यावर अधिक तपास सुरू होईल आणि संबंधित घटकांवर कारवाई केली जाईल. अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत जुळून राहा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!