महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील मजुरी रक्कम लवकर अदा करावी

मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील मजुरांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची मजुरी रक्कम वेळेवर न मिळत असल्याबाबत मजुरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही मेळघाटातील गरीब आदिवासी लोकांसाठी जीवनावश्यक आर्थिक स्तोत्र म्हणून कार्यरत आहे .परंतु या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे मजुरीचे पैसे अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. या मजुरीच्या रकमेची वर्षभराची मुदतही ओलांडली आहे तरीही ती रक्कम अद्याप त्यांना मिळालेली नाही. मेळघाटातील आदिवासी लोकांचा उदरनिर्वाह मोठ्या प्रमाणावर या रोजगार हमी योजनेवर अवलंबून आहे. त्यांना सुविधा पुरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांचे जीवन सुधारण्यासाठी आणि त्यांना गावात राहून रोजगार मिळवण्यासाठी ही योजना एक महत्त्वाची संजीवनी ठरली आहे. अशा परिस्थितीत जर या मजुरीची रक्कम लवकर अदा केली नाही तर ते पुन्हा रोजगार मिळवण्यासाठी इतर गावांमध्ये भटकायला लागतील. आणि त्यांचे जीवन आणखी कष्टी होईल त्यामुळे त्यांना दिलासा मिळवण्यासाठी ही रक्कम त्वरित अदा करावी असे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.