Amaravti GraminLatest News
मा. खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते बहिरम बाबा जत्रेतील शंकरपटाचे उद्घाटन
सातपुड्याच्या पायथ्याशी आयोजित होणारी विदर्भाची सर्वात मोठी बहिरम बाबाची जत्रा सुरू झाली आहे. या जत्रेतील आकर्षण असलेल्या 'हिंदकेसरी शंकरपट'चे उद्घाटन उद्घाटन माजी खासदार नवनीत रवी राणा यांच्या हस्ते पार पडले
बहिरम बाबाची जत्राचे शंकरपटच्या या भव्य स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार नवनीत रवी राणा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार प्रवीण तायडे, आमदार केवलराम काळे, भाजपाचे नेते सुधीर रसे, प्रमोद राव कोरडे आणि भाजपाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी बहिरम बाबा मंदिराचे दर्शन घेतले. या शंकरपटाच्या उद्घाटनासोबतच, जत्रेत हजारोंच्या संख्येने गर्दी जमली आहे. तीन दिवस चालणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे बक्षीस रक्कम दर्शकांना आकर्षित करत आहे.
बहिरम बाबा जत्रेमध्ये विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि खेळांच्या कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यावर्षी शंकरपट स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.