25 जानेवारी पर्यंत कोलकास येथे हत्तीवर ची सवारी बंद, कोणतं कारण
सध्या कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे मेळघाट मधील कोलकास येथील हत्ती वर स्वारी करण्यास पर्यटकाना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण थंडीच्या दिवसात हत्तीच्या पायाला भेगा पडत असल्याने मेळघाट व्याग्र वन विभागाने हत्तीची काळजी निर्णय घेतला आहे. विदर्भात केवळ अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील कोलकासमध्ये हत्तीची सवारी केली जाते. सध्या थंडीची लाट असल्याने मेळघाट मधील हत्तीनीच्या पायाला भेगा पडतात. त्यामुळे 10 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत कोलकास मधील हत्ती सवारी बंद राहणार आहे…हत्तींच्या पायाना भेगा पडू नये यासाठी चोपिंग केल्या जात आहे या दरम्यान हत्ती च्या पायांची शुश्रुषा, गरम पाणी आणि तेल यासोबत वनौषधींचा वापर करून हत्तींचे पाय शेकले जाणार आहे. हत्तीनींचे पाय मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी पायांना भेगा पडू नये यासाठी चोपिंग केले जाते.थंडीमुळे हत्ती च्या पायांना भेगा पडू नये यासाठी हत्तीनी च्या पायाला चोपिंग केल्या जात असते या दरम्यान 10 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत कोलकास मधील हत्ती सवारी बंद राहणार आहे. त्यानंतर पुन्हा पर्यटकांना हत्ती वर स्वारी करण्यास मिळणार आहे.