( राजेश मालवीय प्रतिनिधि )अमरावती येथील ग्रुप श्रीवारी सेवा तिरुमल्ला देवस्थानम.येथे सेवा देत आहे सदर सेवा दि 06 ते 12 जानेवारी 2025 अशी 7 दिवस ची सेवा देत आहे सदर सेवेत अमरावती येथील महसूल विभागात कार्यरत क्लास 2 अधिकारी श्री आशिष दीपक नागरे,नायब तहसिलदार तिवसा, श्री मयुर इप्पर नायब तहसिलदार तहसिल कार्यालय लोणार, श्री जगन्नाथ गिरी, सहाययक महसूल अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती,श्री मनोज नाईकर जिल्हा न्यायालय बुलढाणा,योगेश सिंगरकर, प्रतापराव मोरे(देशमुख) बुलढाणा असा ग्रुप होता. शासकीय रजा नियमानुसार मंजूर करून घेऊन तिरुपती बालाजी येथे सेवा देण्यात येत आहे.
मागील 20 वर्ष पासून दरवर्षी तिरुपती बालाजी येथे ग्रुप सह दर्शन करता येत आहे यावर्षी माहे नोव्हेंबर मध्ये सेवा देणे कामी नोंदणी केली असता आम्हा 6 जण चा वैकुंठ एकादशी चे मुहूर्तावर तिरुपती बालाजी येथे श्रीवारी सेवा देण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली.सदर सेवा कालावधीत काजू कटिंग, भक्तांना कॅन्टीन मध्ये नाश्ता, जेवण,चहा वाटप करणे ची सेवा देण्यात आली असुन एक दिवस तिरुपती बालाजी चे गाभाऱ्यातील मंदिरात लकी ड्रॉ द्वारे नाव निघून सेवा देण्याची संधी प्राप्त झालेली आहे त्यामुळे आम्ही सर्व खूप आनंदी आहोत.
एक दिवस तिरुपती बालाजी मंदिरातील गाभाऱ्यातील सेवा देण्यासाठी लकी ड्रॉ द्वारे संधी मिळाली, आणि ही संधी प्राप्त झाल्याने सर्व सदस्य अत्यंत आनंदी आहेत. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सेवा देण्यासाठी नोंदणी केली होती आणि वैकुंठ एकादशीच्या मुहूर्तावर ती सेवा देण्याची संधी मिळाली.